धाराशिव (प्रतिनिधी)- तुमच्या वयाचा मान ठेवतो म्हणुन तुमच्यावर आम्ही बोलत नाही. पण त्याचा तुम्ही चुकिचा अर्थ काढत असाल यापुढे वडीलावर टिका केल्यास ती अजिबात खपवुन घेणार नसल्याचा इशाराच ओमराजे निंबाळकर यांनी प्रा. तानाजी सावंताना दिला आहे. उपळा येथे आयोजित लोकसभा निवडणुक प्रचार सभेत खासदार ओमराजे बोलत होते.

प्रा.तानाजी सावंत यानी ढोकी येथे (ता.25) रोजी मेळावा आयोजीत केला होता. त्यावेळी प्रा.सावंत यानी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली होती. मात्र प्रा.सावंत यानी स्वर्गीय पवनराजेसाहेब यांच्यावरही विनाकारक टिका केल्याने ओमराजे यानी त्यांना थेट उत्तर दिले आहे.

यावेळी ओमराजे म्हणाले की, आम्ही तुमच्यासोबत गद्दारी केली नाही म्हणुन तुमचा राग आमच्यावर आहे. या अगोदरही ही खदखद तुम्ही अनेकवेळा बोलुन दाखविली आहे. आता तुम्ही बोलण्याची मर्यादा ओलांडली आहे, तुमची पात्रता नसताना पवनराजे साहेंबावर बोलण्याचे धाडस केले आहे. हे मी कदापी सहन करणार नसल्याचे खासदार ओमराजे यानी सावंताना प्रतित्त्तुर दिले. एवढे शिक्षण गोल्डमेडलिस्ट, पीएचडी धारक असल्यानंतरही तुमच्या बोलण्याची पध्दत अत्यंत खालच्या पातळीवर असल्याचे आश्चर्य आहे. यावरुन तुमच्यावर संस्कार करण्यात तुमचे माता पिता कमी पडले का अशी शंका येते. तुमचे वय पाहुन आतापर्यंत तुम्हाला काही बोललो नाही याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असे गृहित धरु नये असाही इशारा ओम राजेनिंबाळकर यानी यावेळी प्रा.सावंत याना दिला. यापुढे राजेसाहेबांबद्दल ब्र शब्द देखील आपण काढला तर मी सहन करणार नाही अशा सुचक इशाराच दिला आहे.


 
Top