धाराशिव (प्रतिनिधी)-इतर पक्षातील लोकांना इडी, सीबीआय टॉर्चर करून पक्षात घ्यायचे हे लोकशाहीमध्ये बसत नाही. त्यामुळेच आपण भाजपा सोडून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशी माहिती माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

शनिवारी सांयकाळी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे शिवाजी सरडे, रवी कोरे उपस्थित होते. पुढे बोलताना शिवाजी कांबळे यांनी भाजप कार्यकारिणीची ज्यावेळी मुंबई बैठक होत असे त्या प्रत्येक बैठकीत वाढती महागाई, समाजात असणारी भावना, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या अडचणी हे विषय मांडले. पण लक्ष दिले गेले नाही. भाजपची कार्यपध्दती आपल्या न पटल्यामुळे आपण परत शिवसेनेत आलो आहे. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना राज्यात बहुमत असताना देखील सरकारने विधानसभेत दोन ओळीचा ठराव मांडून मराठा आरक्षण देणे गरजेचे होते. परंतु दिले नाही असेही शिवाजी कांबळे यांनी सांगितले. 


 
Top