धाराशिव (प्रतिनिधी)- ज्याना स्वत:च्या गावातील संत गोरोबा काकाच्या मंदीरावरील पत्रे बदलता आले नाहीत, त्यांना खासदारांनी काय केले हा विचारण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का असा प्रश्न युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी पाटील कुटुंबाला केला आहे. त्या किणी (ता.धाराशिव) येथील सभेत बोलत होत्या.

गेल्या कित्येक वर्षापासुन मागील जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष राहिलेल्या अर्चना पाटील यांना स्वतःच्या गावाचा विकास करता आला नाही. शिवाय राणा पाटील देखली वीस वर्ष राजकारणात वेगवेगळ्या पदावर काम करत असुन त्यानाही तिथे तिर्थक्षेत्राचा दर्जा असतानाही विकास करणे जमलेले नाही. ही बनवाबनवी उघडी होणार असल्याचे दिसल्यावर मॉडेल दाखवायचे, आम्ही अस करणार म्हणत धुळफेक केली जाते. आता अशा फसवणुक करणाऱ्या मंडळीना जनता थारा देणार नसल्याचा टोलाही सक्षणा यानी लगावला.

ही मंडळी सत्तापिपासु असुन याना पद व सत्तेशिवाय राहणे शक्य नाही. त्यासाठी ते कधी कोणत्या पक्षात जातील कोणाचा आधार घेतील हे सांगता येत नाही. अशा गद्दारी करणाऱ्या लोकांना धडा शिकवुन जनतेला हे आवडत नाही हे मतातुन दाखविले पाहिजे असे आवाहन सक्षणा यानी केले.


 
Top