धाराशिव (प्रतिनिधी)-स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणुक प्रमूख श्री. नितीन काळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रवीण पाठक, शहराध्यक्ष अभय इंगळे, सुनील तात्या काकडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, दत्ता पेठे, संदीप इंगळे, नरेन वाघमारे, राहुल शिंदे, पांडुरंग पवार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top