तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना 6 एप्रिलला  घडली आहे. शुभ्रा बालाजी थोरात या  वय 4 वर्षे या लहान मुलीस 5 एप्रिल रोजी रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्याठिकाणी उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी यांनी मुलीवर उपचार न करताच रूग्णांकडे पुर्वी असलेले औषधे देण्यास सांगितले. या मुलीची प्रकृती आधिकच बिघडल्याने तिला लातूरला उपचारासाठी नेत असतानाच या चिमुकलीचा मृत्यू झाला.

दरम्यान मयत मुलीचे वडील बालाजी थोरात यांनी यासंदर्भात ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दिली असून संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली.


झालेला प्रकार गंभीर असून संबंधित वैद्यकीय अधिकारी व परीचारीका यांना या घटनेबाबत खुलासा मागविला असून खुलासा मिळताच पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.-डॉ.संगमेश्वर धोंगडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय,तेर


 
Top