तुळजापूर (प्रतिनिधी)- मोदीच्या जीवावर आम्ही निवडुन येऊ असा विरोधकांना विश्वास आहे. जिल्ह्यातील जनतेचे मोदीपेक्षाही आपल्या दररोजच्या समस्या कोण सोडविणार याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी शेवटी मोदीची सभा आयोजीत केली आहे. मोदीच्या सभेच्या माध्यमातुन जनतेची मते बदलतील असा त्याना विश्वास वाटत असेलही पण मला माझ्या कामावर व जनतेच्या प्रेमावर विश्वास असल्याचे मत सलगरा दिवटी (ता.तुळजापुर) येथील प्रचार सभेत बोलताना ओम राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी ओमराजे म्हणाले की, जिल्हा मागास यादीत वरच्या क्रमांकात आहे. वर्षानुवर्ष राज्याच्या मंत्रीमंडळात असुनही काही राजकीय नेत्यानी जिल्ह्याला विकासापासुन दुर ठेवल्याचे वास्तव आहे. अजुनही त्याच कुटुंबातील लोक आम्हालाच सत्ता द्या आम्ही विकास करु असे आश्वासन देत आहे. त्यामुळे या ढोंगी व लबाड लोकांना त्यांची जागा दाखवुन द्या असे आवाहन ओमराजे यानी केले. 

यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभिजीत चव्हान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, सत्यवान सुरवसे, लक्ष्मन शिंदे, दगडू शिंदे, बाबासाहेब देवकते, उत्तम पाटील, दादा चौधरी, उमेश खांडेकर, अनिल निर्मळे, बाळू सांगवे, बाबा इंगळे, शिवाजी देशमुख, शाहूराज लोखंडे, नागनाथ शिंदे तसेच समस्त गावकरी उपस्थित होते.


 
Top