तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ  तुळजापूरात  बुधवारी  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेपुर्वी गांधीजींच्या वेषभूषेत हातात तिरंगा भगवा घेवुन प्रचार करीत असलेले अवलिया अपक्ष उमेदवाह मनोहार आनंदराव पाटील यांनी एकट्याने शहारात सर्वञ फिरुन प्रचार केला.

या उमेदवाराची ही अनोखा प्रचार पध्दत पाहुन नागरिक तिथेच थांबले कि लगेच हा तिथेच प्रचाराचे भाषण सुरु करीत होता. यावेळी मतदारांना आवाहन करताना तो म्हणत असे कि गरजवंत मराठ्यांनो मतदानासाठी बाहेर पडा. आपल्या गरीब मराठ्याला विजयी करा, जरांगेच्या पाठीशी उभे राहा, गरीबांना मतदान करा, श्रीमतांना करु नका, सर्वजाती धर्माच्या लोकांनी मतदान करा. मतदान कर्तव्य पार पाडा.


 
Top