तुळजापूर (प्रतिनिधी) -  तिर्थक्षेञ तुळजापूर येथील विवेकानंद भागातील दोन चिमुकल्यांवर रंगपंचमी दिनी शनिवार दि. 30 मार्च रोजी सकाळी आठ वाजता   काळ्या, निळ्या रंगाच्या दोन लीटर बाटलीतील रंग अंगावर टाकल्याने  यात  दोन चिमुकले भाजले गेले आहेत.  सदरील घटना शनिवार दि. 30 मार्च रोजी रंगपंचमी दिनी सकाळी 8 वाजता घडली. या घटनेने शहर हादरुन गेले.

या प्रकरणी सुरज शिवाजी गरुडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, माझे मुले रंगपंचमीदिनी सकाळी पृथ्वी सुरेश गरडकर वय- 12 वर्ष, अजिंक्य सुरेश गरडकर वय - 09 वर्ष असे दोघे जन सकाळी उठले होते. गल्ली मध्ये मुलांचा रंग खेळण्याचा आवाज येत होता. त्यामुळे माझे दोन्ही मुले घराबाहेर रोडवर येवुन थांबुन रंग खेळणाऱ्या मुलांना पाहत होते. त्यातच 08 वाजण्याच्या दरम्यान गल्लीतील पाच ते सातजण  घराकडे येत असताना मोठा मुलगा पृथ्वी अंगावर रंग टाकतेल म्हणुन तो गल्लीत पळत गेला. तेंव्हा त्याचे पाठीमागे हे मुले पळत जावुन त्यांचे हातातील काळा, निळ्या रंगाची दोन लिटर बाटलीतील रंग अंगावर टाकला. नंतर घराकडे येवुन घरा शेजारी माझा लहान मुलगा अजिंक्य याला बाहेर गल्लीतील रस्त्यावर ओडताना इतर मुलांच्या साह्याने त्यांचे हातातील काळा, निळ्या रंगाची दोन लिटर बाटलीतील रंग त्याच्या डोक्या पासुन उजव्या हात पर्यंत टाकुण ते सर्वजन निघुन गेले. माझे दोन्ही मुले घराकडे येवुन कलर टाकलेली जागेत आग उठत आहे असे म्हणाले. त्यामुळे आम्ही दोघांना पण अंघोळ करण्यास सांगीतले. अंघोळी नंतर दोन्ही मुलांच्या कलर टाकलेल्या ठिकानी निळसर जांभळा अशा प्रकाचे डाग दिसु लागले. थोडे वेळाने मुले रडु लागले. त्यामुळे मी दोन्ही मुलांना सरकारी दवाखाना तुळजापुर येथे घेवुन गेलो. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन दोन्ही मुलांना सोलापुर येथे रेफर केले. मी दोन्ही मुलांना

सोलापुर येथे कारदगे त्वचेतज्ञ हॉस्पीटल येथे घेवुन आलो. तेव्हा दोन्ही मुलांच्या रंग टाकलेल्या ठिकाणची त्वचा काळी पडुन आतील मास दिसत होते. दवाखान्यात दोन्ही मुलावर दिवसभर उपचार  केले. यात माझ्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर, चेहरेवर, हातावर, छात्तीवर, दोन्ही पायावर रंगामध्ये काहीतरी ज्वलंतशिल दाह निर्माण करणारा द्रव्यपदार्थ मिसळुन माझ्या दोन्ही मुलांचे अंगावर जबरदस्तीने टाकुन मुलांचे अंगावरील सर्व त्वचा विदरुप करुन गंभीर जखमी करण्यास कारणीभुत झाले आहे. तरी वरील मुलांवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही करावी. अशी तक्रार केली असुन, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


 
Top