तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानक चौका लगत असलेल्या गोडावुन चा गोडावुन किपर यांची प्रमोशन वर बदली होवुन ही त्यांनी प्रमोशन नाकारुन येथेच राहिल्याने गोडावुन किपर ला लागलाय तुळजापूरचा लळा अशी चर्चा होत आहे.

तुळजापूर तालुक्यात 192 रेशन दुकानदार असून, 192 पैकी 112 रेशन दुकानदारांना येथील गोडावुन मधुन अन्नधान्य माल वितरण होतो. गोडावुन किपरची तीन वर्षानंतर बदली होत असते. तुळजापूर येथील गोडावुन किपर यांची प्रमोशनमुळे इतरञ बदली झाली. तरी त्यांनी ते प्रमोशन नाकारुन येथेच राहणे पसंत केले.

येथील गोडावुन मध्ये असे काय आहे कि गोडावुनला प्रमोशन होवुन हि तो ते नाकारुन येथेच राहणे पसंत करीत आहेत हे आश्चर्याची बाब आहे. या गोडावुन मध्ये अन्नधान्याचा दर्जा न बघता तो उतरुन घेवुन गोरगरीब तालुकावासीयांच्या घशात खराब अन्ननधान्य घातले जात आहे. खराब धान्याचे पोत आले कि ते गोडावुन किपर ते पोते परत पाठवुन त्या बदल्यात परत धान्य पोते देण्याचा नियम असताना या नियमाचे पालन करण्यासाठी चालढकल केली जात असल्याने भीक नको पण कुञ आवर म्हणत खराब माल गोरगरीबांचा घशात घातला जातो. हा गरीबीची चेष्टा करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे. खराब धान्य माल तक्रार वर जात नसल्याने यात ठेकेदारचे फावते. यामुळे ठेकेदार ते गोडावुन किपरचे संबध काय असावेत यावर चविष्टतेने चर्चा होत  आहे.


 
Top