धाराशिव (प्रतिनिधी)- ही निवडणुक मी कोणत्याही प्रतिष्ठेसाठी लढत नाही तर सामान्य लोकांच्या अडअडीचणीची सोडवणुक होऊन त्यांचे जीवन माझ्या लोकप्रतिनिधी असण्यामुळे सूकर होण्यासाठी लढत आहे. असे प्रतिपादन खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत केले.

यावेळी आमदार कैलास पाटील, जेष्ट नेते जीवनराव गोरे, माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, संभाजी ब्रिगेडचे शरद पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, स्मिता शहापुरकर, शामल वडणे, खलील सय्यद, शाम घोगरे, प्रशांत पाटील, रोहीत पडवळ, उमेश राजेनिंबाळकर, अग्निवेश शिंदे, सतिषकुमार सोमानी, सोमनाथ गुरव, मिनिल काकडे आदिची उपस्थिती होती.

आमदार कैलास पाटील म्हणाले, महाराष्ट्र कधीच दिल्लीपुढे झुकलेला नाही, अशा कित्येक शाह्या आल्या आणि महाराष्ट्राने त्याला परतवुन लावल्या. आताही अमितशाही प्रवृत्ती आपल्याला ठेचुन काढायची असुन त्यासाठी आपण लढण्यासाठी सज्ज झाल्याचे त्यानी म्हटले आहे. यावेळी जीवनराव गोरे, राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील, संजय दुधगावकर, धीरज पाटील, सक्षणा सलगर यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केले.


 
Top