तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी  मातेच्या चैत्री  पोर्णिमा उत्सव यात्रा व्यवस्था-2024 अनुषंगाने  मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर प्रियंवदा म्हाडदाळकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच शहरातील बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात बँकांच्या सीआरएस फंडातुन चैत्री पोर्णिमा  याञेस येणाऱ्या भाविकांना मुलभुत सोयीसुविधा पुरविणे बाबतीत प्रस्ताव ठेवला. बँकाने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देवुन सोयीसुविधांचा लेखी प्रस्ताव पाठवा आम्ही निश्चीत मदत करण्याचे आश्वासन दिले. 

त्यामुळे यंदाच्या चैञी पोर्णिमा याञेला बँकांचा मदतीचा हातभार लागणार आहे. श्रीतुळजाभवानी मातेची चैञी पोर्णिमा याञा प्रथमच बँकाँचा मदतीने पार पाडली जाणार असून, यामुळे नगर परिषदला अर्थिक लाभ होणार आहे. सदरील उपक्रम राबविण्यासाठी एकेकाळी बँक अधिकारी असलेल्या प्रशिक्षणार्थी  मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर आयएएस यांनी पुढाकार घेतला.

श्री तुळजाभवानी मातेच्या चैञी पोर्णिमा याञेत कष्टकरी शेतकरी भाविक मोठ्या संखेने येतो. लाखोच्या संख्येने येणारे भाविक व नागरिक यांना सुविधा मिळवण्यासाठी शहरातील राष्ट्रीयकृत बँकांची बैठक सर्किट हाऊस तुळजापूर येथे घेण्यात आली.

यावेळी भारतीय स्टेट बँक शाखाधिकारी सचिन भोसले, कॅनरा बँक शाखाधिकारी सागर पांडे, आयडीबीआय बँक शाखाधिकारी प्रदीप पाटील, ॲक्सिस बँक तारेख अहमदी, शैलेश डांगे विभागीय अधिकारी कोटक महिंद्रा बँक, शाखाधिकारी व अधिकारी तसेच नगरपरिषद तुळजापूर कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, नगर अभियंता अतुल तोंडारे, अशोक सनगले, प्रशांत चव्हाण,महेश गवळी इत्यादी उपस्थित होते.


 
Top