तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा  संघर्ष योध्दा मनोज जरांगे हे सोलापूर ला जात असताना सोमवार दि 29रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर ते पश्चिम महाराष्ट्राच्या सरहद्द पर्यत गावोगाव त्यांचे वाहन अडवुन मराठा समाज बांधवांनी भर उन्हात त्यांचे जोरदार स्वागत केले.यावेळी युवा वर्ग मोठ्या संखेने उपस्थितीत होता.

तिर्थक्षेञ तुळजापूरची हद्द असलेल्या बायपास वर स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी, अजय सांळुके, कुमार टोले, औदुंबर जमदाडे, नानासाहेब  डोंगरे आदी प्रमुख मंडळी सह शेकडो मराठा  समाज बांधवांनी स्वागत केले. तेथुन सिंदफळ, माळुंब्रा महामार्ग रस्ता सांगवी, सुरतगाव, तामलवाडी येथे मराठा समाज बांधवांनी स्वागत केले. तेथुन ते पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरकडे रवाना झाले.


 
Top