भूम (प्रतिनिधी)-गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती भूमच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये आयोजित करण्यात औलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेत विशेष नैपुण्य मिळवलेल्या शिक्षक व विद्यार्थी यांचे सन्मानार्थ आज दि. 29/04/2024 रोजी तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा सन्मान कर्तृत्वाचा विद्यार्थी व शिक्षकांचा आयोजित करण्यात आला.

तालुक्यातील सर्वच शाळांतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने गुटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार वर्षभरामध्ये झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण एकाच व्यासपीठावरून करण्यात आले. यामध्ये तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा विद्यार्थी व शिक्षक, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, शासकीय बालचित्रकला स्पर्धा, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, सारथी निबंध स्पर्धा व तालुकास्तरीय निपुणोत्सव या स्पर्धांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमद शेख शिक्षण विस्तार अधिकारी, प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवचे अधिव्याख्याता प्रदीप घुले व मिलिंद अघोर, शिक्षण विस्ताराधिकारी सोमनाथ टकले व अनिता जगदाळे तसेच पत्रकार धनंजय शेटे व पत्रकार आप्पासाहेब बोराडे हे उपस्थित होते.

प्रास्ताविकामध्ये शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मधील विविध स्पर्धांमधून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशाच प्रकारे पुढील काळातही भूम तालुक्यातील विद्यार्थी भरघोस यश संपादन करतील असे गटशिक्षणाधिकारी राहूल भट्टट्टी यांनी नमुद केले. दरवर्षी अशाच प्रकारचा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्याचा मानसही व्यक्त केला. अधिव्याख्याता मिलिंद अघोर यांनी आपल्या मनोगतात भूम तालुका हा गुणवत्तापूर्ण आहे, केवळ अभ्यासातच नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने भूम गटशिक्षण कार्यालयाने विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची ही उत्तम परंपरा सुरु केल्याचे प्रतिपादन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गुंजाळ यांनी केले तर आभार विशेष शिक्षक राहुल ठोंबरे यांनी मानले. उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव चे अधिव्याख्याता मिलिंद अघोर व प्रदीप घुले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती भूम येथील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेषत्वज्ञ, विशेष शिक्षक व कार्यालयीन परिचर यांनी परिश्रम घेतले.


 
Top