तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तिर्थ (ब्रु) येथील ग्रामदेवत असलेल्या कालभैरवाची याञा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

रविवार दि. 28 एप्रिल रोजी तिर्थब्रु येथील कालभैरव मंदिरातील मुर्तीस सकाळी अभिषेक करुन दुपारी ग्रामस्थांनी नैवध दाखवला. नंतर पुजा-याच्या घरी वास्तव्यास असलेल्या दुसरी कालभैरव मुर्ती वाजतगाजत गावातुन मिरवणुक काढुन ग्रामदेवता  कालभैरव मंदिरावर नेण्यात आली. राञभर तिथेच ठेवण्यात आली. नंतर सोमवार सकाळी सात नंतर ही मुर्ती वाजत गाजत पुजाऱ्याचा घरी आणली. तिथे मुर्तीची आरती करण्यात आली. ही मुर्ती वर्षभर आता पुजाऱ्याच घरी वास्तव्यास ठेवण्यात येते. यावेळी मिरवणूकीत पालखी, काठ्यांसह सोंगे सहभागी झाले होते. दोन दिवसात गावासह पंचक्रोषीतील हजारो भाविकांनी याञेत सहभाग नोंदवला. या याञेनिमीत्ताने भजन, किर्तन कार्यक्रम आयोजित केले होते. याला ही मोठा प्रतिसाद मिळाला होता.


 
Top