धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय जंगम संघटना धाराशिव यांच्या वतीने आज निवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव यांना कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील सौदंती येथील नेहा हिरेमठ हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फैयाज शेख या संशयित आरोपीची केस फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवून आरोपीस त्वरित शासन मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी तुळजापूर तालुका राजेंद्र स्वामी, लोहारा तालुका समन्वयक दत्तात्रय स्वामी, विश्वनाथ स्वामी, अप्पू हिप्परगे, विकास स्वामी, ओम स्वामी, नागेश स्वामी, प्रवीण विरभद्र स्वामी, प्रवीण निलया स्वामी, प्रकाश स्वामी, कार्तिक स्वामी, योगीराज कपाळे, महेश स्वामी, योगेश कपाळे, शंकर स्वामी सारोळकर यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.


 
Top