धाराशिव (प्रतिनिधी)-श्रमदान हीच राष्ट्रीय सेवा समजून महाविद्यालयाच्या वतीने  ग्रामीण पातळीवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमदान केले जाते. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच भरीव योगदान असून जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात तळागाळापर्यंत त्यांनी आपले कार्य पोहोंचवले आहे. या अंतर्गतच ब्लड डोनेशन , मेडिकल कॅम्प अशा विविध समाजपयोगी सेवा दिल्या जातात. यातूनच प्रेरणा घेऊन येथील

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर पळसवाडी व आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिरामध्ये ग्राम स्वच्छता, शालेय विद्यार्थी संगणक साक्षरता, ग्रामीण  कंपोस्ट पिट, शोष खड्डा बांधकाम ,नवीनतम ऊर्जा स्त्रोतांचा अभ्यास व उपयोजीता, वृक्ष दत्तक योजना ,महिलांचे आरोग्य, स्वयंरोजगार, मतदार जागृती व श्रमदानातून शाळा सुशोभीकरण इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. शिबिराचे सदर शिबिराचे उद्घाटन पळसवाडी  ग्रामपंचायत चे सरपंच श्री हरिभाऊ सोनटक्के, ग्रामसेविका सौ बुरगुटे मॅडम, बिभीषण शिरसाट, लक्ष्मण मुळे. शिवाजी कोळगे,अमोल पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने,कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद तांबारे, प्रा. डी.एच. निंबाळकर, प्रा.बी एस चव्हाण, प्रा. डीडी मुंडे ,श्री. आर.एल. मुंडे,श्री वाघमोडे व एन एस एस चे विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत पार पडले.

या शिबिरात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की , राष्ट्रीय सेवाभाव विद्यार्थीदशेतच मनामध्ये  निर्माण व्हावा ही या  राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या पाठीमागील संकल्पना असूनया राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा अंतर्गत ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना काम करायची संधी मिळत असून त्या माध्यमातून समाजाभिमुख अनेक चांगली कामे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून एनएसएस शिबिरात  होत आहेत. विद्यार्थीही यामध्ये अगदी तन, मन देऊन काम करत असल्यामुळे ग्रामीण भागाशी त्यांची चांगल्या पद्धतीने नाळ जुळून येते.

गावकरीही विद्यार्थ्यांच्या श्रमदानामुळे समाधानी होतात या गोष्टीचा आनंद होत आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रा. प्रमोद तांबारे  म्हणाले ,2008-09 ला पळसवाडी येथे एनएसएस शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळची गावाची स्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येते.

पूर्वीचे गाव ,छोटी घरे, रस्त्यावरील सांडपाणी व आजचे सुंदर गाव, व्यवस्थित घरे, नीटनेटके सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छता यामुळे समृद्ध झाले आहे .त्यामुळे सामाजिक प्रश्न बदललेले असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांशी सुसंवाद साधून स्त्री शिक्षण , आरोग्य ,गोबर गॅस ,कंपोस्ट खत ,संतुलित आहार या विषयावर प्रबोधन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

त्यानंतर गावचे सरपंच सोनटक्के यांनी शिबिराला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प याविषयी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. एनएसएसच्या माध्यमातून मुलांनी केलेल्या भरीव कामगिरीचे पळसवाडी येथील सरपंच व ग्रामस्थांनी कौतुक केले.  आळणी येथील शाळेमध्ये ही विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन ,त्यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच दिवस पळसवाडी येथे विविध उपक्रमामध्ये भाग घेऊन गावकऱ्यांशी आपुलकीचे  नाते निर्माण केले. त्यामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी महिलांसाठी विविध स्पर्धा , हितगुज व वैयक्तिक आरोग्य याविषयी सुसंवाद करून त्यांना आवश्यक गोष्टीचे वाटप केले. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांबरोबर संगणक साक्षरता ,मतदार जागृती इत्यादी उपक्रमात सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांनी आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे जाऊन शाळा सुशोभीकरणांमध्ये श्रमदान करून उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला .या अंतर्गत अशोक वृक्षाची लागवड श्रमदानाने शाळेच्या बागेमध्ये केली.तसेच माती पसरणे, विद्यार्थ्यांची संगणक साक्षरता वाढवणे, मध्यान भोजन मध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणे ,त्यांच्याशी विविध  मनोरंजनाचे खेळ घेऊन संवाद साधला .त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री तांबोळी सर व इतर शिक्षक वृंद हजर होते. त्यांनी यावेळी प्रा. प्रमोद तांबारे, प्रा.  डी डी मुंडे व विद्यार्थ्यांचे आभार मानून सत्कार केला. तसेच आगामी काळात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आळणी येथील शाळा दत्तक घेऊन शालेय विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करावे अशी अपेक्षा मुख्याध्यापक श्री तांबोळी सर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच दिवस पळसवाडी येथे विविध उपक्रमामध्ये भाग घेऊन गावकऱ्यांशी आपुलकीचे नाते निर्माण केले.  महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी महिलांसाठी विविध स्पर्धा ,हितगुज व वैयक्तिक आरोग्य याविषयी सुसंवाद करून त्यांना आवश्यक गोष्टीचे वाटप केले. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांबरोबर संगणक साक्षरता, मतदार जागृती इत्यादी उपक्रमात सहभाग नोंदवला.


 
Top