कळंब (प्रतिनिधी)- भारतीय बौद्ध महासभा व सावित्रीबाई फाउंडेशन तर्फे युवकांसाठी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त कळंब शहरातील समता नगर येथील बुद्ध विहार येथे दि.19 एप्रिल 2024 रोजी शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी जापनीज, जर्मन भाषा कशी शिकावी? बॅरिस्टर,डिलीट या पदव्या कशा मिळवाव्यात? इंग्रजीवर प्रभुत्व कसे मिळवावे? परदेशातील शिष्यवृत्ती कशी मिळवावी?याविषयी फाउंडेशनचे मार्गदर्शक किशोर भगत यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे कळंब शहराध्यक्ष सी.आर.घाडगे होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश धावारे,जोशाबा पतसंस्थेचे संचालक महेंद्र रणदिवे,अरुण लोंढे,पत्रकार प्रा.अविनाश घोडके,पांडुरंग पवार,महादेव टोपे,किरण नाईकवाडे,विशाल धावारे,हनुमंत गाडे,किरण नाईकवाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख लक्ष्मण धावारे यांनी केले तर विशाल वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.


 
Top