तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या चैत्री याञेची  तयारी सुरु आहे. ती अंतिम टप्यात आली आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर नगरपरिषद पोलिस आरोग्य एसटी महामंडळसह याञा संबंधित विभाग तयारीवर अखेरचा हात फिरवत आहेत. श्रीतुळजाभवानी मातेचा मुख्य चैञी पोर्णिमा सोहळा सोमवार दि. 23 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे.

याञा उत्सव काळात श्रीतुळजाभवानी मंदीर सलग बावीस तास दर्शनार्थ खुले असणार आहे. चैञी पोर्णिमा निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी सहा पानपोयी उघडल्या जाणार आहे. भाविकांच्या स्नानासाठी घाटशिळ वाहन तळा जवळील भवानी तिर्थ कुंड सुरु करण्यात आले. भवानी तिर्थकुंड स्नानासाठी दि. 21 एप्रिलपासुन खुले केले जाणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहने मंदिराकडे येवू नयेत म्हणून बँरेकेटींग लावण्यात आले आहेत. याञा काळात शहर दररोज तीन टप्यात स्वछ केले जाणार आहे. यासाठी जादा स्वछता कर्मचारी कार्यान्वित केले आहेत. दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. भाविकांना शुध्द पाणी मिळण्यासाठी नळदुर्ग रस्त्यावर असणाऱ्या दोन फिल्टर टाक्या स्वछ धुवुन घेतल्या आहेत.

धाराशिव व नळदुर्ग रोडला दोन नव्याने वाहनतळे याञेसाठी उभारण्यात आले आहेत. चैत्र यात्रे निमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता दिनांक 21 एप्रिल 2024 ते 25 एप्रिल 2024  कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपात दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. देणगी दर्शन व्यवस्था बिडकर पायऱ्या मार्गे करण्यात आली आहे. याञा काळात मंदीर पहाटे एक वाजता चरणतिर्थ करण्यात धर्म दर्शनार्थ खुले केले जाणार आहे.


 
Top