तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या चैञी पोर्णिमा सोहळ्याचा पार्श्वभूमीवर रविवार दि 21पासुन श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ बिडकर पायऱ्या येथुन भाविकांना दर्शनार्थ श्रीतुळजाभवानी मंदीरात सोडण्यास आरंभ करण्यात आला. तर भाविकांच्या स्नानाच्या सोयीसाठी भवानी तिर्थकुंड रविवार दि. 21 एप्रिल पासून खुले करण्यात आले. ही सुविधा दि. 25 एप्रील 2024 पर्यत कार्यान्वित करण्यात येणार आहे.

चैत्र महिन्यातील हा पहिली याञा असुन या याञेत दर्शनार्थ प्रामुख्याने सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, अठरा पगड जातीधर्माचे भाविक प्रामुख्याने प्रचंड संखेने येतात. या याञेसाठी येणारा भाविक वर्ग तिर्थक्षेञ  तुळजापूरात आला कि थेट श्रीतुळजाभवानी  दर्शनार्थ जातो व दर्शन केले कि थेट गावी जातो. या पार्श्वभूमीवर याञेस पळती याञा म्हणून संबोधले जाते. तिर्थक्षेञ शिखर शिंगणापूर शंभूमहादेव दर्शन घेतल्यानंतर  लगेचच भाविक हा चैञी एकादशी दिनी  तिर्थक्षेञ पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रुकमीनी दर्शन घेतो. तेथुन तो थेट तिर्थक्षेञ तुळजापूरला श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येतो. ही भाविकांची होणारी गर्दी व चैञी पोर्णिमा सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांच्या  सोयीसाठी श्रीतुळजाभवानी  मंदीर पहाटे एक वाजता दर्शनार्थ खुले केले जाणार असुन बीडकर पायऱ्या वरुन धर्म, मुखदर्शन, सशुल्क दर्शनार्थ रांगेतुन सोडले जाणार आहे. कुंभार गल्लीत असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्गाने अतिक्रमणे केल्याने या रस्त्यावरून ये-जा करताना भाविकांना कसरत करावी लागणार आहे. आज पासुन तुळजाई नगरी भाविकांनी गजबजुन जाणार आहे.


 
Top