धाराशिव (प्रतिनिधी)-आज ONGC कंपनीच्या उडठ मधून KYAN कंपनीच्या प्रोजेक्टरच्या माध्यमातून डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आली. याबाबतचा 264000/- रू. किमतीचा संपूर्ण सेटअप आज कंपनीच्या प्रतिनिधींनी वर्गात कार्यान्वित करून दिला. 

या प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमातील अध्ययन अनुभव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देता येणार आहेत. गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास, इंग्रजी व इतर विषयातील विषयातील अवघड संकल्पना विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. याबद्दल जिल्हा प्रशासनाचे व ongc  कंपनी चे मनापासून आभार. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी शाळेत यापूर्वीच एक इंटरॲक्टिव्ह बोर्ड, दहा एलईडी टीव्ही बसविण्यात आलेल्या आहेत. शाळेत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिले जातात. व त्यात अजून kyan कंपनीच्या प्रोजेक्टर ने भर घातली आहे या प्रोजेक्टर च्या माद्यमातून आधुनिक पद्धतीने व तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. याचा लाभ शाळेतील जवळपास 260विद्यार्थ्यांना होईल ongc  कंपनीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.


 
Top