तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.

 इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचा सन 2023-2024 चा निकाल जाहीर झाला असून धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील एकूण 3 विद्यार्थी पात्र झाले आहेत. अर्जुन अविनाश पाडुळे, इंद्रवर्धन शरद गोडगे,विराज आबा पौळ या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.यशस्वी विद्यार्थ्यांना एस.एस. बळवंतराव, एस.यू. गोडगे एस यु, एस.बी. पाटील, ऐ.बी. नितलीकर यांनी मार्गदर्शन केले.


 
Top