भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील युवक सूरज संजय सावंत याने इरिगेशन ऑफिस भूम परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुरजला भूम येथील रविकांत ऐलगुंडे, अंकित थोरात, अनिकेत शिंदे, ईश्वर तेलंगे या चार तरुणांनी त्यांचे संबंधित तरुणीशी का बोलतो व तिच्याकडे का येतो म्हणत खैरे हॉस्पिटल भूम समोर दिनांक 29 मार्च रोजी मारहाण केली. यावेळी सूरज वडिलांना म्हणाला की वारेवडगाव मार्गे बऱ्हाणपूरला येतो. व तो या मारहाणीनंतर घरी न गेल्यामुळे त्याचा शोध घेऊन तो न सापडल्यामुळे दि.30 मार्च रोजी सुरजचे वडील यांनी भूम पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेबाबत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे सूरज हा आत्महत्येस प्रवृत्त झाला व त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद संजय सावंत यांनी भूम ठाण्यात दाखल केली आहे. रविकांत ऐलगुंडे, अंकित थोरात, अनिकेत शिंदे, ईश्वर तेलंगे या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


 
Top