तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या थाळीफेक स्पर्धेत समृद्धी जयराम माने हिने प्रथम क्रमांक पटकावला तर गायत्री गोकुळ सावतर व पल्लवी बापू माने हिने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तेर ता. धाराशिव येथील महाराष्ट्र संत विद्यालयाच्या मैदानावर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवी मधील मुलींसाठी थाळीफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक जे .के .बेंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस .एस. बळवंतराव, एस. टी. कोळी, आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत समृद्धी जयराम माने, गायत्री गोकुळ सावतर, पल्लवी बापू माने यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी या यशस्वी विद्यार्थ्यांना रचना कंट्रक्शनचे दत्तात्रय मुळे, महाराजा स्पोर्ट्सचे नरेश चंदिले, सुर्या पान स्टॉलचे गोविंद खोटे यांच्याकडून विजेत्यांना महाराष्ट्र दिनी बक्षीसाचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांनी परिश्रम घेतले.