तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुका किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी तेर येथील हनुमंत कोळपे यांची तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम यांनी निवड केली आहे.

किसान मोर्चाच्या तेर विभाग प्रमुखपदी गोरख माळी, तेर विभाग कार्याध्यक्षपदी नवनाथ पसारे, तेर विभाग संघटकपदी सुनील गायकवाड, तेर अध्यक्षपदी किरण फंड, उपाध्यक्षपदी अश्रूबा पाडूळे, अमोल चौगुले, कार्याध्यक्षपदी अमित कोळपे, संघटकपदी काकासाहेब मगर, सचिवपदी राहुल गायकवाड, सहसचिवपदी अर्शाद मुलांनी, कोषाध्यक्षपदी गणेश नाईकवाडी,सहकोषाध्यपदी नारायण साळुंके,तेर विभाग प्रसिध्दी प्रमुखपदी विकास भोरे,प्रभाग क्रमांक एक च्या अध्यक्षपदी रजनीकांत पेठे,दोन च्या अध्यक्षपदी सुहास नाईकवाडी, तीन च्या अध्यक्षपदी कैलास पांचाळ,चार च्या अध्यक्षपदी अनिल कुलकर्णी,पाच च्या अध्यक्षपदी खंडू माने,सहा च्या अध्यक्षपदी अभिजित करंडे यांची किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम यांनी निवड केली आहे.पदाधिकारी यांना निवडीचे नियुक्तीपत्र किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण साळुंके, श्री संत गोरोबा काका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोळपे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.


 
Top