कळंब (प्रतिनिधी)-  तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी यात्रा आज मंगळवार पासुन सुरु होत असल्याने यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यावर्षी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या आहेत.जिल्हा पोलिस प्रशासनाने यात्रा काळात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणुन येरमाळा मार्गे जाणाऱ्या आवजड वाहन बाह्यवळन दि. 23 ते 28 एप्रिल दरम्यान पर्यंत केली आहे. तसे वाहतूक व्यवस्थेतील बदल यात्रा परिसरात दिशादर्शक फलक,नकाशे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रकाशित केले आहे.

येडेश्वरी यात्रेला राज्यासह बाहेर राज्यातील भाविक पारंपरिक चुना वेचण्याचा कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. सोमवारी पहिल्या पौर्णिमेलाच भाविकांनी मोठी गर्दी केली असून यंदाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरेल असे वाटते. भाविकांसह यात्रेसाठी विविध व्यावसायिक दाखल झाले असून हॉटेल, कोल्ड्रिंक्स, ज्युसवाले, आईस्क्रीम, रसवंती, फळाची, किराणा, नारळ, मिठाईवाले, भांडी, प्रसादाची दुकाने, दागिन्यांची, खेळण्याची, दुकाने तसेच मनोरंजनाचे दोन रहाट पाळणे, मौत का कुआ, ब्रेकडान्स, झुले, हवेच्या घसरगुंडी, असे विविध व्यवसायिक यात्रेसाठी दाखल झाले आहेत.

कायदा सुव्यवस्था व गर्दीमुळे वाहतुक कोंडी होऊ नये शिवाय गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारी, महिला भाविकांच्या अंगावरील दागीने चोरीच्या प्रकाराला आला घालण्यासाठी येडेश्वरी मंदिर रस्ता, पालखी मार्ग, गावातील मुख्य चौक, बसस्थानक आमराईरीतील पालखी मार्ग, आमराई यात्रा परिसरात तर चौरस्त्या वरील उड्डाणपूला पर्यंत असा एकूण 5 किमी अंतराच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी प्रमाणे यात्रा यंदाही सीसीटीव्हीच्या नियंत्रणात निर्विघ्न पार पडणार असुन यात्रा काळात अनुचित प्रकारावर नियंत्रण येणार आहे


 
Top