धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील स्काऊट -गाईड कार्यालयात जिल्हा निवडणूक विभागाद्वारे स्वीप विभाग, जि.प. शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या माध्यमातून जिल्हातील माध्यमिक शाळेतील कलाध्यापकांची मतदानाचा टक्का वाढवा याकरिता मतदारांनी 100 टक्के मतदान करावे. यासाठी या कार्यशाळेच्या आयोजनात जिल्हा कलाध्यापक संघाचे 23 कलाध्यापकांनी अतिशय उत्तम 35 भित्तीचित्रे (पोस्टर्स) निर्मिती केली. या कार्यशाळेसाठी उपस्थित कलाध्या कांना या भित्तीचित्र (पोस्टर ) तयार करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने माऊंट बोर्ड सह इतर  सर्व रंग साहित्यासह चहापान दुपारच्या भोजनाची सोय केली होती. या निवडणूक विभागाच्या वतीने मतदान जनजागृती पोस्टर कार्यशाळा उपक्रमात सहभागी कलाध्यापकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष , मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी धाराशिव उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, सहाय्यक नोडल अधिकारी तथा जि.प. धाराशिव शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती सुधा साळुंके यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या व सदर कार्य शाळेस्थळी विस्तार अधिकारी स्वीप विभाग टी. एफ.काझी, कार्यशाळा प्रमुख तथा कलाध्यापक संघ जिल्हासचिव शेषनाथ वाघ , विस्तार अधिकारी भारत देवगुडे, विस्तार अधिकारी बालाजी यमुरवाड,सांगळे, जंगम आदि कर्मचारी वृंद, धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघाचे कार्याध्यक्ष शिवाजी भोसले, जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे आदि पदाधिकारी , स्काऊट गाईड जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे उपस्थित होते. सदर भित्तीचित्र (पोस्टर ) कार्यशाळेतून उत्कृष्ठ पोस्टर निर्मिती होऊन याचा मतदार जन जागृतीसाठी नक्की उपयोग होऊन मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल.


 
Top