धाराशिव (प्रतिनिधी)-तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथे  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने, श्री कोचिंग क्लासेसचे संचालक मा.दीपक भराटे,  महाविद्यालयाचे कर्मचारी, बारावी सायन्स व महाविद्यालयाचे विद्यार्थी  उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम म्हणून बारावी सायन्स शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकर सुरू होणाऱ्या एम एच टी सी इ टी 2024-25 या परीक्षेची पूर्वतयारी होण्याच्या उद्देशाने ऑनलाईन पद्धतीने सराव परीक्षेचे, करिअर गायडन्स व शालेय विद्यार्थी सुसंवादचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

त्याचबरोबर  अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, एकांकिका, व्याख्यान, प्रदर्शन व 18 तास अभ्यास उपक्रम अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्राचार्य डॉ.माने यांनी विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन मध्ये मिळणाऱ्या विविध सवलती व स्कॉलरशिप याची माहिती सांगून आमच्या महाविद्यालयामध्ये कमिन्स स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थिनी बरोबर संवाद घडवून आणला.

यावेळी तेरणा अभियांत्रिकी मधील प्राजक्ता तांबारे,रिद्धी रोंघे, शिवपूजा देवकाते व मयुरी कवडे या  कमिन्स  इंडिया फौंडेशन शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींनी बारावी सायन्स च्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना  अभियांत्रिकी महाविद्यालयामधील रेडिओ स्टेशन, ड्रोन सेंटर , एप्पल लॅब याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. श्री संजॉय मैंदर्गी  यांनी तेरणा रेडिओ 90.4 याविषयी प्रात्यक्षिक करून सविस्तर माहिती दिली. ड्रोन विषयी प्रा. उमेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना ड्रोन बद्दल प्रात्यक्षिक दाखवून संकल्पना सादर केली तर विद्यार्थ्यांना एप्पल लॅब बद्दल, विविध आधुनिक कॉम्प्युटरचे ज्ञान व प्रत्यक्ष सॉफ्टवेअर हाताळणी याबाबत प्रा.एस व्ही टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशश्वी होण्यासाठी प्रा.प्रमोद तांबारे, प्रा. अभिजीत रणखांब ,  श्री.आर एल मुंडे, यांचे सह श्री. अविनाश सरवदे  यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top