कळंब (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14/04/2024 रविवार रोजी भारत देशात समता,बंधुता आणि स्वातंत्र्य ही जीवनमूल्ये जनमाणसांत रुजावी, प्रत्येक व्यक्तीस सामाजिक न्याय मिळावा यासाठी आपलं समस्त आयुष्य या देशातील लोकांना समर्पित करणारे महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या.जयंतीनिमित्त महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाविद्यालयाचे रासेयो विभाग प्रमुख प्रा.ज्योतीराम जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयांतील प्रा. विनायक मिटकरी,डॉ.हनुमंत माने,डॉ.रघुनाथ घाडगे,डॉ.अनंत नरवडे, प्रा.पंडित शिंदे,विठ्ठल फावडे,जयसिंग चौधरी,सुंदर कदम,दत्ता गायकवाड,संजीव शेंडगे तसेच महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top