भूम (प्रतिनिधी)-तालुक्यासह शहरात भारतरत्न, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. भूम शहरात रमाई नगर, गोलाई चौक, इंदिरानगर, भिमनगर व बस आगार येथे डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. 

रमाई नगर येथे भूम नगर पालिकेचे गटनेते संजय गाढवे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.  सहाय्यक राज्यकर आयुक्त मुंबईचे आनंद गवळी व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य संयोगिता गाढवे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. भिमनगर येथे पो नि प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण व गटनेते संजय गाढवे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. भूम आगारामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कर्मचाऱ्यांच्या वतीने अन्नदान केले. येथे आरोग्यदूत डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते पूजा पाठ करण्यात आला. यावेळी आगारप्रमुख दीपक लांडगे यांच्या सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमाई नगर येथे  माजी नगरसेविका सारिका थोरात, माया धावारे, लक्ष्मी सुकाळे, शांताताई सोनवणे, लक्ष्मी कांबळे,  मंगल डाके, सरोजा शिंदे, अर्चना सोनवणे, रेखा सोनवणे, रंजना सोनवणे, शारदा सोनवणे, बौद्धाचार्य आर के सुकाळे,  महादेव पायाळ, संजय बनसोडे, दत्तात्रय पाटोळे, उत्तम धावारे, सुनिल  थोरात, व्ही जे वाघमारे, प्रा. राजेंद्र बनसोडे , प्रा. आर. एन. शिंदे, शाहूराज ओव्हाळ, मेघराज गायकवाड, युवराज ओव्हाळ, प्रदीप चंदनशिवे, दामोदर गायकवाड, अजित सोनवणे,  वस्ताद मामू जमादार, माजी नगरसेवक किरण जाधव, बाळासाहेब अंधारे, बाळासाहेब सुर्वे, रामभाऊ बागडे, रामभाऊ ओव्हाळ, प्रमोद सोनवणे, नवनाथ सोनवणे, बापू सोनवणे, मोहन ओव्हाळ यांच्यासह भीम सैनिक मोठया संख्येने हजर होते.


 
Top