नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे दि.14 एप्रिल रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जन्मोत्सव समितीचे सल्लागार पद्माकर घोडके यांनी केले होते.

शहरांतील होळकर चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पद्माकर घोडके यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, माजी नगरसेवक सुधीर हजारे, भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार, शहर भाजपचे अध्यक्ष धीमाजी घुगे, रिपाइंचे शहर अध्यक्ष मारुती खारवे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, पत्रकार उत्तम बनजगोळे, गजानन हळदे, आकाश घोडके,शिवसेनेचे बंडप्पा कसेकर व किरण दुस्सा आदीजन उपस्थित होते.


 
Top