नळदुर्ग (प्रतिनिधी)-  समता, स्वतंत्र बंधुता, न्याय समानता आणि अखंडता सांगणारे विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने नळदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  पुतळ्याची भव्य मिरवणुक काढुन भीमनगर येथे पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

त्याचबरोबर डॉ आंबेडकर नगर , इंदिरानगर , बुद्ध नगर, येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी अमरदीप लेझीम संघाच्या खेळाडूंनी आपली कला सादर केली. याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सैनिक राजरत्न बनसोडे , योगेश सुरवसे यांनी निळ्या ध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन केले.  

यावर्षी नळदुर्ग शहरात बाबासाहेबांचा नविन पुतळा आणण्यात आला आहे त्यामुळे या पुतळयाची मिरवणुक काढण्यात आली ही मिरवणुक डॉल्बी सिस्टीम व लेझीम पथकासह काढण्यात आली. हि मिरवणुक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक, अक्कलकोट रोड , बुद्धनगर, डॉ आंबेडकर नगर , मार्गे भिमनगर या मार्गावरुन काढण्यात आली. मिरवणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात ठेवण्यात आला. यावेळी शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top