तेर (प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील तेर येथे विजेच्या तारेच्या घर्षणामुळे झाडाला आग लागल्याची घटना दि. 13 एप्रिलला दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील व्यंकट माळी यांच्या रहात्या घराजवळील नारळाच्या झाडाला विजेच्या तारेच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून नारळाच्या झाडाला आग लागली.उपस्थित युवकांनी नारळाच्या झाडाला लागलेली आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.