धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्त केलेले भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (आयआरएस) प्रदीप डुंगडुंग हे काल रात्री धाराशिव येथील शिंगोली विश्रामगृह येथे दाखल झाले आहे.  त्यांचा मुक्काम अजिंठा सूट येथे राहणार आहे.

7 मे 2024 रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.या निवडणुकीची अधिसूचना आज 12 एप्रिल रोजी प्रसिध्द झाली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च निरिक्षक म्हणून आयआरएस अधिकारी डुंगडुंग यांची नियुक्ती केली आहे.निवडणूक खर्चाविषयी तक्रार असल्यास सी-व्हिजील अँपवर नोंदवावी.तसेच निरिक्षकांच्या 7666429538 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.


 
Top