तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेचे पुजारी तथा माजी उपनगराध्य संभाजी शिवाजीराव लोंढे 72 यांचे शनिवार 13 एप्रिल रोजी पहाटे 1.30 हदयविकाराचा तीव्र झटक्याने राञी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या वर सकाळी मोतीझरा स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. कै संभाजी लोंढे हे शेकापचे निष्ठावंत कार्यकते होते.