तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील आबजान मौजन व आल्फिया मौजन या चिमुकल्यांनी रमजान महिन्यातील पवित्र असा आपला पहिला रोजा अर्थात उपवास पुर्ण केला.

येथील 7 वर्षाचा आबजान आयाज मौजन व 5 वर्षाची आल्फिया इलियास मौजन या चिमुरड्यांनी रमजान महिन्यातील पवित्र असा आपला पहिला रोजा अर्थात उपवास पुर्ण केला. आबजान व आल्फिया  मौजन हे नळदुर्ग येथील अब्दुल्ला शहा येथे  शिक्षण घेत आहेत. सध्या उन्हाचा पारा वाढला असून, अशा कडक उन्हाळ्यात देखील लहान वयातच आबजान व आल्फिया या बहिण-भावाने रोजा धरून तो पुर्ण केल्याने पुष्पहार घालून मौजन परिवार तसेच नातेवाईकांनी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


 
Top