तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे जेष्ट नेते माजीमंञी मधुकर चव्हाण व भाजप  उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचा हातात हात घेतलेला फोटो मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने जिल्हयात व  खास करून तुळजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या फोटो मागेच गुपीत काय असावे याची उत्सुकता लागली आहे.

सदरील फोटो बाबतीत सत्य अद्याप तरी बाहेर आले नाही. जेव्हा या फोटो मागचे सत्य बाहेर येईल तेव्हाच या घटनेवर भाष्य करणे योग्य ठरणार असल्याचा प्रतिक्रिया सर्वच पक्षांच्या नेत्यांमधुन दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडी उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या दिवशी हा फोटो प्रचंड वेगाने सर्वञ व्हायरल झाल्याने यामागे राजकिय डावपेच तर नाही ना असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

या बाबतीत अधिक चर्चा  अशी की, मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी दुपारी सोलापूर येथील शासकीय विश्रामधाम येथे बंद खोलीत  सुमारे पंधरा मिनीटे चर्चा झाल्याची चर्चा सर्वञ होत आहे. या बंद खोलीत काय चर्चा झाली या बाबतीत अनेक तर्कविर्तक काढले जात आहेत. ही बंद खोलीतील चर्चा धाराशिव जिल्हयातील राजकिय भुकंपाची नांदी तर नाही असा प्रश्न राजकिय जाणकारांना पडला आहे. धाराशिव लोकसभा मतदार संघ शिवसेनाउबाठा कडुन खेचण्यासाठी भाजप वाटेल ते करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.


आजोबा देंवेद्र फडणवीस बरोबर तर नातु ओमराजे सोबत ?

काँग्रेसचे माजी मंञी मधुकर चव्हाण हे मंगळवारी सोलापूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बंद खोलीतील भेट फोटो व्हायरल होत  असताना त्यांचा नातु जि. प.सदस्य बाबुराव चव्हाण यांचे पुञ प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अभिजीत चव्हाण माञ महायुती उमेदवार खासदार ओमराजे सोबत तुळजापूरला असल्याने चव्हाण घराण्यात चाललय काय अशी चर्चा सर्वञ चर्चिली जात आहे.


फोटो व्हायरल अचुक टायमिंग !

चव्हाण फडणवीस भेट फोटो व्हायरल टायमिंग अतिशय अचुक असल्याने या भेटी बाबतीत  अनेक चर्चला उधाण आला आहे.


ती सदिछा भेट काँग्रेस मध्येच राहणार-माजी आमदार चव्हाण 

सोलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट ही सदिच्छा भेट आहे. परंतु काही लोकांनी मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर टाकल्या. त्यामुळे जनतेमध्ये गैर समज निर्माण होऊ शकतो. त्यासाठी हा खुलासा करीत असून, मी काँग्रेस मध्येच आहे. यापुढेही काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहे.


 
Top