धाराशिव/भूम (प्रतिनिधी)- कसबा श्रीराम मंदिरात श्रीराम जन्म उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी केली होती. सकाळी श्रीरामाच्या मुर्तीस पवमान अभिषेक महापुजा यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेत बार्शी येथील नारदिय किर्तनकार सुनिल बडवे यांचे किर्तन होवुन फुले उधळून जन्मसोहळा संपन्न झाला. 

धाराशिव शहरात कसबा श्रीराम मंदिर, समर्थ नगर श्रीराम मंदिर येथे भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीराम प्रतिष्ठाणच्यावतीने श्रीरामाची पूजा करण्यता आली. तर भूम मध्ये रावसाहेब बुरटे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी नारदिय किर्तनकार सुनिल बडवे यांच्या किर्तनासाठी पेटीसाथ मुकूंद महाराज बेलसरे व तबला साथ नंदकुमार देशमुख यांनी केली. जन्म सोहळ्यानिमित्त धाराशिव शहरातील प्रमुख चौकात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आल होतो. तर भूममध्ये पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी मंदीर भेट देवुन चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.


 
Top