तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूर नगरीतील  पुरातन श्री राम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना नंतर पहिलाच रामजन्मोत्सव (रामनवमी) सोहळा बुधवार दि. 17 रोजी  मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

बुधवारी सकाळी प्रभु श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण मुर्तीस अभिषेक करण्यात आल्या. नंतर प्रभु श्रीरामचंद्र सह सीता, लक्ष्मण मुर्तीस वस्ञ घालण्यात येवुन अलंकार घालण्यात आले. या पुजेचे पौराहित्य राममंदिराचे पारंपारिक पुजारी राजाभाऊ आण्णासाहेब भोसले,  दिलीप आण्णासाहेब भोसले, रवि भोसले, रत्नदीप भोसले, मोहन भोसले सह भोसले परिवाराने केले. दुपारी मंदिर प्रांगणात रामजन्मोत्सव सोहळा हजारो महिला व रामभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आज दर्शनार्थ दिवसभर रामभक्तांनी  मोठी गर्दी केली होती. रामनवमी निमित्ताने प्रभु श्रीरामचंद्रास  साखरेचा हार घालुन रामफळ भिजलेल्या हरभरा दाळीचा नैवध दाखवून रामभक्तांनी प्रभु श्रीरामचंद्राचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच तालुक्यातील आपसिंगा, काक्रंबा, कुंभारीसह अनेक गावातील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. 
Top