तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानने चैञी पोर्णिमा याञा उत्सव धार्मिक कार्यक्रम जाहीर केले आहेत.

यंदा चैञी पोर्णिमा  उत्सव मंगळवार  दि. 23 एप्रिल रोजी देविचा वारा दिवशी आला. या पार्श्वभूमीवर चैञी पोर्णिमा उत्सवाचे धार्मिक विधी मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी होणार आहेत. सोमवार दि. 22 एप्रिल रोजी रात्रौ छबिना. मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी रात्रौ छबिना व जोगवा विधी. बुधवार दि. 24 एप्रिल  रोजी रात्रौ छबिना. याची भाविक भक्तांनी  नोंद घेण्याचे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर  यांनी केले आहे.


 
Top