कळंब (प्रतिनिधी)-कळंब आगारात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए. डब्ल्यू. एस. भारती तर प्रमुख पाहुणे म्हणून अतुल गायकवाड हे लाभले. प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक जगदीश गवळी यांनी ‌‘जातीपलीकडील बाबासाहेब यावर मार्गदर्शन केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. कळंब आगारातील सहा एसटी कर्मचाऱ्यांचे मुले एमबीबीएस साठी पात्र झाल्यामुळे व दोन पाल्य बँक मॅनेजर या पदासाठी  पात्र झाल्यामुळे त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध रणदिवे तर आभार प्रदर्शन नितीन गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत गायकवाड, नितीन गायकवाड, सुनील जगताप, बाबासाहेब धावारे, महेंद्र शेंडगे,  विश्वनाथ गव्हाळे, नागटिळक मच्छिंद्र तोरगले, प्रकाश पटेकर अशोक लाड, चिलवंत तर महिला कर्मचाऱ्यातून औसेकर मॅडम, पालके,  सोनवणे,  शिंदे,  वाघमारे व रणदिवे मॅडम यांनी सहकार्य केले.


 
Top