तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर येथील राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब  यांच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत वर्गणी मुक्त शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या शहरातील चार शिवजन्मोत्सव मंडळाचा शिवमुर्ती देवुन  सत्कार करण्यात आला.

यंदा तिर्थक्षेञ तुळजापूर येथे लाखो रुपये वर्गणी मागुन धांगिंडधिंगा  पध्दतीने शिवजयंती साजरी केली. पण यातही चार शिवजन्मोत्सव मंडळीने आर्दश  निर्माण करणारी शिवजयंती साजरी केली. यांचा सत्कार अध्यक्ष विपिन शिंदे, धनंजय सावंत, सचिन  शिंदे, डांगे यांच्या हस्ते शिवमुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.


 
Top