तुळजापूर (प्रतिनिधी)-  241 विधानसभा मतदार संघातील 1907 मतदान कर्मचारी यांची निवडणूक प्रशिक्षण महर्षी विठ्ठल शिंदे विद्यालय तुळजापूर येथे  रविवार दि. 7 एप्रिल रोजी आयोजित केले होते. या  प्रशिक्षणास एकूण 1820 कर्मचारी हजर व 87 कर्मचारी यांनी दांडी मारली. या गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या असून, समाधानकारक खुलासा नाही आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची तजवीज ठेवल्याचे नोटीस मध्ये नमूद केले आहे. प्रशिक्षणास जिल्हाधिकारी धाराशिव यांनी भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले.

सदर प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले असून प्रशिक्षणार्थी यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार ढवळे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर हजर होते. प्रशिक्षणासाठी उपस्थित मतदान अधिकारी यांच्यापैकी एकूण 755 अधिकाऱ्यांनी तुळजापूर मध्ये निवडणूक कार्य प्रमाणपत्रद्वारे मतदान करण्यासाठी अर्ज केला आहे.

उस्मानाबाद मतदार संघातील इतर तालुक्यातील निवडणूक कार्य प्रमाणपत्रसाठी एकूण 590 अर्ज आले असून, तिसऱ्या टप्प्यात मतदान असलेल्या इतर दहा लोकसभा मतदारसंघातील टपाली मतपत्रिकेसाठी 176 अर्ज आल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार ढवळे यांनी सांगितले.


गैरहजर कर्मचारी

मतदान केंद्राध्यक्ष 22, प्रथम मतदान अधिकारी 16,  इतर मतदान अधिकारी 49 असे एकूण 87 कर्मचारी गैरहजर होते.


 
Top