तुळजापूर (प्रतिनिधी)- देशात जे लोक चांगले काम करतात त्यांना जेल मध्ये घातले जाते. असा आरोप करुन सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना पराभूत करा असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शरद पवार यांनी केले.

बुधवारी (दि. 24) सायं. 6 वा.जुन्या बसस्थानकाजवळ झालेल्या या सभेस खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जीवन गोरे, माजी आमदार राहुल मोटे, अमित पाटील, अप्पासाहेब पाटील, नंदूराजे निंबाळकर, प्रतापसिंह पाटील, संजय दुधगावकर, सक्षणा सलगर, अमर मगर, विश्वास शिंदे, जिल्हाअध्यक्ष धिरज पाटील, शफी शेख, रामचंद्र आलुरे, संजय दुधगावकर, संजय निंबाळकर, अशोक जगदाळे, नय्यर जहागीरदार, धर्यशिल  पाटील, अभिजीत चव्हाण, डॉ. स्मिता शहापूरकर, नगिनाताई कांबळे, शामल वडणे, उत्तम अमृतराव, मुकुंद डोंगरे, रुषी मगर, सुधीर कदम, शाम पवार, कमलाकर चव्हाण, अमोल कुतवळ आदी व्यासपीठावर उपस्थितीत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पवार म्हणाले कि, देश सर्वसामान्य लोकांचा आहे. महागाई पन्नास दिवसात कमी करतो असे आज 3650 दिवस झाले तरीही महागाई कमी झाली नाही. आज महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. 2014 ला हे सत्तेवर आले. गँसचा दर 430 वरुन 1167 वर गेला. इंधन दर वाढले, शंभर टक्के युवकांना रोजगार देतो म्हणून सांगितले. आज 87 टक्के लोकांना रोजगार नसल्याचा आरोप केला. दिल्लीचे मुख्यमंञी अरविंद केजरीवाल तीन वेळा मुखमंञी झाले. त्यांनी शिक्षण, आरोग्य, विज क्षेत्रात चांगले काम केले. तर त्यांना जेल मध्ये टाकले संजय पानसे व शशीकांत शिंदे लोकसभेचे उमेदवार होताच त्यांना ईडीच्या नोटीसा पाठवल्या. सत्तेचा गैरवापर करणे यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचा आरोप यावेळी केला.

येथील युवा नेत्यास आमदार नसताना काहीतर चांगले काम करेल म्हणून मंञी केला. पण त्यांनी मलाच दूर केले. याला एकच उत्तर आहे ते म्हणजे ओमराजेंना निवडून देवुन उत्तर देणे. शासनाचा योजना वापरुन स्वताचा म्हणून सांगत आहेत. हे आज मला कळाले. कितीही संकटे आले तरी ओमराजेंना मते देवुन विजयी करा व विकासाची मशाल अखंड पेटती राहु द्या असे शेवटी आवाहन केले.

यावेळी बोलताना निंबाळकर म्हणाले कि. यांचे युवा नेते अंगाने वाढले बुध्दीने वाढले नाही अशी टीका मल्हारचे नाव न घेता केला. भाईयो  और बहीणो  म्हणून उत्पन्न दुप्पट झाले का ? असा सवाल करीत  आता कसे वाटतय असे उपरोधात्मीक म्हणत शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे केंद्र सरकारने केल्याचे सांगुन शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट असताना अबकि बार चारशे पार होईल का ? असा सवाल केला. तामिलनाडूचे आरक्षण टिकते तर आमचे का टिकत नाही असा सवाल करुन पन्नास टक्के पुढे आरक्षण मर्यादा वाढवा ही मागणी मी केली. मी मराठाच नाहीतर धनगर, लिंगायत, मुस्लीमांना आरक्षण देण्याची मागणी केली. रामदरा धाटणी बँरेज  मधील कामे जयंत पाटील मंञी असताना मंजूर करुन घेतले. खासदार निधी शंभर टक्के खर्च केला. कोरोना  काळात मी जिल्हयात फिरत होते हे घरात होते. शासनाकडुन पैसे घेवुन रुग्णावर उपचार केला. माञ मोफत उपचार केला म्हणून सांगत हिंडत आहे. मते धाराशिव जिल्हयाचे हाँस्पीटल नेरुळ ला का? असा सवाल केला. यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार प्रचंड  संख्येने उपस्थित होते.


 
Top