भूम (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील पत्रकाराला परिवारासकट मारहाण केली असल्याने भूम पत्रकारांच्या वतीने या झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध नोंदवून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावा व पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत त्यांच्या वरती कारवाई करावी अशी मागणी केली आहे .

दिनांक 21 एप्रिल रोजी दैनिक नवराष्ट्र चे पत्रकार राहुल कोळी यांनी तुळजापूर शहरात चालू असलेल्या अन्न व भेसळ संबंधित वृत्त प्रकाशित केले असल्याने त्या वृत्ताची दखल घेत भेसळ अधिकारी यांनी कारवाई केली असता तुळजापूर शहरातील काही गुंडवृत्तीचे व्यापारी यांनी राहुल कोळी यांना त्यांच्या परिवाराला व त्यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली असल्याने व मारहाणी दरम्यान राहुल कोळी यांचा मोबाईल फुटला आणि इतरत्र नागरिक जमा झाले असल्याने हल्लेखोर पळून गेले ही एक निंदनीय बाब आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधला जात असताना जे कार्य संबंधित विभागाने सुजान नागरिकांनी अथवा लोकप्रतिनिधींनी करायला हवे आहे असे कार्य एक पत्रकार या नात्याने जर पत्रकार खरी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत असेल त्या प्रयत्नाला यश येऊन जर कारवाई होत असेल तर याला पत्रकारच जबाबदार का धरला जातोय व पत्रकारच का बळी ठरतोय याचे गांभीर्याने विचार शासकीय वरिष्ठ अधिकारी व राज्यकर्ते यांनी करावयास हवे जर असे अवैद्य धंदे चालू असतील याला जर पत्रकार वाचा फोडणार नसतील तर निश्चितपणाने आपला देश, प्रदेश, जिल्हा, तालुका,गाव निश्चित प्रगती करणार ? असा सर्वसामान्य माणूस या हल्ल्या संदर्भात बोलू लागला आहे. पत्रकारांवरती एकीकडे विधानसभेमध्ये संसदेमध्ये कायदा पारित होतोय मात्र त्या कायद्याची कुठेही अंमलबजावणी होत नाही असाच तर्क मागील झालेल्या दैनिक संचार चे जिल्हा प्रतिनिधी यांच्या वरचा हल्ला व आता तुळजापूर मध्ये झालेला दैनिक नवराष्ट्र च्या पत्रकारावरचा हल्ला याच्यावरून  स्पष्टता दिसत आहे 

ज्या सर्वसामान्यांचे आरोग्याच्या हिताची बातमी प्रसिद्धी करून ज्या वस्तू पासून लोकांच्या आरोग्यास बाधा पोचणार होती त्याचा उलगडा केले असल्याने पत्रकारांवर जर असे हल्ले होत आहेत तर भविष्यात पत्रकारिता ही खरी लिहावी का असा प्रश्न सुद्धा पत्रकारांना पडला जात आहे. भूम तहसील कार्यालयात तहसीलदार राजेश लांडगे यांना निवेदन देताना नंदकुमार देशमुख, प्रमोद कांबळे, धनंजय शेटे, आबास सय्यद वसीम काजळीकर, तानाजी सुपेकर, शंकर खामकर, आबासाहेब बोराडे, अरविंद शिंदे, अजित बागड, आशिष बाबर, गौस शेख आदी उपस्थित होते.


 
Top