भूम (प्रतिनिधी)- भगवान महावीर जयंतीनिमित्त भुम शहरातील जैन बांधवांच्या वतीने  रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली.  

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त येथील कसबा जैन मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. बाजार रोड, गोलाई चोक, मेन रोड, नगरपालिका मार्गे ही मिरवणूक निघून कसबा जैन मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी पुरुष, महिला व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  ब्रहामण संघटनेच्या वतीने पुजा करण्यात आली. भगवान महावीरांच्या उपदेशाप्रमाणे ही मिरवणूक अत्यंत साधी व शिस्तपूर्ण होती. या मिरवणुकीत अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल, शितलभाई शहा, अभयकुमार गांधी, विवेक पोकर्णा, स्वप्नील शहा, प्रदीपकुमार आहेरकर, डॉ. शांतीनाथ अंबुरे,  बाहुबली एखंडे, राजकुमार आहेरकर, सुदीप महाजन, निलेश शहा, संतोष मुनोत, राजकुमार पितळे, नेमचंद मुनोत, नेमचंद पोकर्णा, विजयकुमार सुरपुरिया, सतीश मनोत, अमोल मुनोत,सचिन गुगळे,संतोष मुनोत, गयाचंद पोकर्णा, नेमीचंद पौखर्णा, सुनील सास्तुरे,आदी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top