परंडा (प्रतिनिधी) - जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक निमीत्त आज दिनांक 21 एप्रिल 2024  रविवार रोजी सकल जैन समाज परंडा दिगंबर आणि श्वेताम्बर दोन्ही पंथाच्या जैन धर्मियांनी परंपरागत एकत्रीतपणे भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची शोभा वाजत गाजत यात्रा काढली. 

सदरील मिरवणुक मंडई पेठ येथील श्री अजितनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर येथून सकाळी 9 वाजता सुरु होवून कुऱ्हाड गल्ली येथील श्री जैन श्वेतांबर मल्लिनाथ मंदिर येथे 10.30 वाजता विसर्जित झाली. सदरील मिरवणुकीदरम्यान भगवान महावीर स्वामी यांच्या घोषणा देत समाजातील सर्व अबाल वृद्ध आणि युवक युवतींनी सहभाग नोंदविला . तद्नंतर भगवान महाविरांच्या जन्म कल्याणक उत्सव निमीत्त 14 स्वप्न आणि महाविरांच्या पाळण्याचे  पूजन तसेच आरती , स्नात्र पुजा आदी धार्मिक विधी श्री जैन श्वेतांबर मल्लिनाथ मंदिर येथे आनंदाच्या वातावरणात साजरे करण्यात आले.

यावेळी सुयोग शाह उपअध्यक्ष , सुहास शाह अध्यक्ष यांच्यासह  समाजातील इतर मान्यवर राहुल शहा, धन्यकुमार मोदी, प्रमोद एखंडे, पांडुरंग कासार, सौरभ शहा ,प्रभात शाह, रतिलाल शाह, किरण शाह, बिपिन मेहता, महेश मेहता , पराग बेदमुथा,अभय देसाई, अमोल देसाई, जितेंद्र जैन, प्रवीण मुनोत, जवाहरलाल परांडकर, धनंजय परांडकर,  उज्वल बेदमुथा, राकेश बेदमुथा, पंकज बेदमुथा, रोहित बेदमुथा, राहुल बेदमुथा, यश शहा , कमलेश शाह , शरद  पोरवाल, मोतीलाल बेदमुथा, यश मुनोत, रमनलाल बेदमुथा, समीर बेदमुथा, सचिन बेदमुथा, संतोष बेदमुथा, सुरेश कात्रेला, मोहनलाल देसाई व समाजातील महिला, युवक युवती आदी उपस्थित होते.


 
Top