उमरगा (प्रतिनिधी)- शेतीतील डीपीचे फ्यूज घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला ही घटना शनिवारी दि 20 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुंन्हाळी शिवारात घडली.

या बाबतचे वृत्त असे की,कुंन्हाळी येथील शेतकरी विष्णू सिद्राम हुडगे वय 45 वर्षे हे जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने शेजारच्या शेतात असलेल्या डीपीचें फ्यूज घालण्यास गेले असता एका हाताने फ्यूज घालत असता दुसरा हात शेजारच्या लोखंडी खांबाला लागला दरम्यान ठिणग्या पडत आल्याचे पाहून दूर जाण्याचा प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांना शॉक लागला यात हुडगे हे जागीच मरण पावले.दरम्यान दुपारी एक वाजता उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या शरीराची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अत्यंत सुस्वभावी, सोज्वळ असलेल्या तरुणास करंट लागून मृत्यू आल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,आई पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद उमरगा पोलिसात झाली असून रात्री सात वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top