भूम (प्रतिनिधी)- श्रीराम मंदीर येथे श्रीराम नवमी निमित्त दि 9 ते 24 एप्रील या कालावधीत उत्सवा निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम संस्थान य़ाच्या वतीने करण्यात आले आहे.

दि 9 ते 16 एप्रील या कालावधीत नवरात्र उत्सव राहील या आठ दिवसाच्या कावावधीत दैनंनदिन श्री च्या मुर्तीस अभिषेक, दुपारी महिला भजन, सायंकाळी उपासना व आरती व रात्री पुरुष भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत.  दि 17 रोजी रामजन्म सोहळा निमित्त हभप सुनिल महाराज बडवे बार्शी यांचे किर्तन होईल. फुले उधळून दुपारी बारा वाजता जन्म सोहळा होवुन पाळणा महाआरती व रात्री श्रीरामाची कसबा विभागातुन मिरवणुक होणार आहे. दि 18 रोजी सकाळी 8 ते 11  शहरातुन भिक्षा कार्यक्रम होईल. रात्री भजन  होईल. दि 19 रोजी सायंकाळी हभप श्रीराम महाराज केजकर यांचे नारदिय किर्तन होवुन  प्रभु श्रीरामाचा सीता स्वयंवर सोहळा सायंकाळी 7 वाजता होईल व रात्री श्रीरामाची गरुड देवावरुन कसबा विभागातुन वरात काढण्यात येईल. दि 20 रोजी रात्री 9.30 वा हभप ढगे महाराज यांचे  किर्तन, दि. 21 रोजी रात्री सुयोग केसकर सांचे नारदिय  किर्तन, दि 22 रोजी हभप चंद्रकलाताई पाटील म्हैसगाव यांचे किर्तन, दि 23 रोजी पहाटे हनुमान जयंती सोहळा व रात्री संजय गरुड पुणे यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल. दि. 24 रोजी पहाटे श्री हनुमान जयंती सोहळा होईल. महाप्रसाद होवुन रात्री तालुका परिसरातील भजनाचा हरीजागर होवुन उत्सवाची सांगता होणार आहे.


 
Top