तुळजापूर (प्रतिनिधी)-  भारतात  निवडणुकीत  पैसे घेवुन म्हणजे नोट के बदले वोट देण्याचे प्रमाण वाढले होते. या विरोधात  गावोगाव आपल्या मतांची विक्री करु नका असा लोकशाही सुदृढ करणारे जनजागृतीपर  फलक सजग मतदार लावुन करीत आहे. विशेष म्हणजे असे लावलेले फलक सोशलमिडीया वर सुध्दा फेमेस होत आहेत.

विशेष गावात लावलेले फलक रातोरात सोशलमिडीयातील व्हॉटस्‌‍ॲप, फेसबुक, इंस्टाग्राँम माध्यमातून प्रचंड वेगाने मतदारांचा मोबाईलवर जात आहेत. न आवाहन करता एकमेकांना ही पोस्ट टाकली जात आहे. इकडे राजकिय पक्षांच्या आरोप, प्रत्यारोप  टीका करणाऱ्या पोस्ट हजारोने फिरत असताना या हजार पोस्ट मध्ये ही एकच पोस्ट  सर्वाचे लक्ष वेधुन घेत आहे.


आजचा बाजार भाव 

या हेडलाईन खाली म्हैस 80 हजार, बैल 50 हजार, बकरा 10 हजार, कुञा 5 हजार, डुकर 3 हजार ते 5 हजार आणी निवडणुकीत स्वताला विकणाऱ्या माणसाची किंमत 500 ते 1 हजार रूपये फक्त. स्वताला विकणाऱ्याला सांगा अरे तुझा पेक्षा डुक्कर महाग आहे. स्वाभीमानाने मतदान करा असा संदेश देणारा फलक सध्या अनेक गावात लावले असुन ते सोशल मिडीयावर सर्वाधिक पसंतीस उतरले आहे.


 
Top