धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय छावा संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी दापका (ता.उमरगा) येथील बाळासाहेब अशोकराव माने यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र माने यांना देण्यात आले.

बाळसाहेब माने यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उमरगा ते मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे दालन अशी साडेपाचशे किलोमीटर पायी यात्रा काढून आवाज उठविलेला. निराधारांसाठी पेन्शन योजना तसेच छावा संघटनेचे उमरगा तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना विविध सामाजिक कामे केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी माने यांच्यावर युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. तसेच जिल्हा सचिवपदी ज्योतीराम काळे, वाहतुक आघाडी धाराशिव तालुका उपाध्यक्षपदी नेताजी मुळे, यांचीही यावेळी निवड करण्यात आली. यावेळी छावा संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, जिल्हा संघटक अमोल गोरे, वाहतूक आघाडी अध्यक्ष श्रीहरी भोसले, सोशल मीडिया उपाध्यक्ष नानासाहेब गुंड यांच्यासह इतर कार्यकर्तेे उपस्थित होते.


 
Top